आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश:नॅशनल हायस्कुलमध्ये वाढीव तुकड्या आणि नवीन अभ्यासक्रमाला शासनाची मान्यता

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पसंख्यांक मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व प्रकारचे शिक्षण मिळावे खा. गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. खा.गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नॅशनल हायस्कूल आणि कॉलेजच्या कला व वाणिज्य शाखेच्या वाढीव तुकड्यांना व एमए, एम कॉम आणि बीएसस्सीच्या अभ्यासक्रमाला शासनाने मान्यता दिली आहे.

शासनाने नवीन तुकडया आणि अभ्यासक्रमाला मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांना आता त्यांच्याच परिसरात उच्च शिक्षण मिळणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मुस्लीम समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खा. गोडसे यांच्यावर मुस्लीम समाजाच्या शिक्षण क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवीन अभ्यासक्रमाला मान्यता

शहरातील सारडा सर्कल परिसरात युथ एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांसाठी नॅशनल हायस्कूल व कॉलेज आहे. या परिसरात मुस्लीम समाजाची मोठी संख्या असल्याने विद्यार्थ्यांसाठी महाविद्यायातील वर्गाच्या तुकडया कमी पडत होत्या. नॅशनल हायस्कूलमधील तुकडया आणि नवीन अभ्यासक्रमाला मान्यता मिळावी यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खा.गोडसे यांची भेट घेत त्यांना साकडे घातले होते.

मुस्लीम समाजाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी न्यायिक असल्याने खा.गोडसे यांनी नॅशनल हायस्कुलच्या वाढीव तुकड्या आणि नवीन अभ्यासक्रमाला मान्यता मिळावी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. खा.गोडसे यांनी काही महिन्यांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन नॅशनल हायस्कुलच्या वाढीव तुकड्या आणि नवीन अभ्यासक्रमाला मान्यता किती गरजेचे आहे हे पटवून दिले होते.

शासनाने दिली मान्यता

जुने नाशिक परिसरात असलेली मुस्लीम समाजाची आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या बघता त्या तुलनेने नॅशनल हायस्कूलमधील तुकड्या खुपच कमी पडत असल्याची आणि नवीन अभ्यासक्रमाची निकड यांची दखल तात्कालीन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी घेतली. सदर विषय तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ना. सामंत आणि खा. गोडसे यांनी मागील महिन्यात दिल्या होत्या. प्रशासनाने नुकत्याच काढलेल्या आदेशाव्दारे नॅशनल हायस्कुलला कला व वाणिज्य शाखेच्या वाढीव तुकडयांना व एम.ए., एम.कॉम,आणि बी.एस्सी.च्या अभ्यासक्रमाला नुकतीच शासनाने मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मुस्लिम समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. असून आज नॅशनल हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष बबलु पठाण, उपाध्यक्ष अलिम शेख, सचिव प्राचार्य जाहीद शेख, खजिनदार गौस नुर खान आदी पदाधिकाऱ्यांनी खा. गोडसे यांचा विशेष सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...