आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:30  जानेवारीपर्यंत रिक्त पदांची माहिती देण्यासाठी शासनाची मुदत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनच्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी रिक्त पदांची माहिती देणे आवश्यक आहे. डिसेंबर २०२२ अखेरचे मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (इ-आर-१) हे ३० जानेवारी २०२३ पर्यंत सादर करावे लागणार आहे. त्याबाबत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी सूचनाही केल्या आहेत.

अंगीकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका तसेच व्यापारी व खासगी क्षेत्रातील २५ किंवा अधिक लोक काम करतात, अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यवसाय कारखाने यांचा समावेश करण्यात आला आहे. या आस्थापनांनी वेतनपटावर असलेल्या सर्व मनुष्यबळांची माहिती (इ-आर-१ विवरणपत्र) www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर द्यावी.

बातम्या आणखी आहेत...