आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटना:सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नाशिक; राज्य सरकारी कर्मचारी संघटना अध्यक्षपदी वाघ

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी दिनेश वाघ यांची निवड झाली आहे. सरचिटणीसपदी सुनंदा जरांडे यांची वर्णी लागली आहे. राज्य सरचिटणीस विश्वास काटकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झालेल्या बैठकीत ही निवड झाली. २२ शासकीय विभाग एकत्रित असलेल्या संघटनेत प्रत्येक विभागाचा पदाधिकारी असावा व सर्व विभागांना न्याय मिळावा या उद्देशाने एक पद देण्याचे विश्वास काटकर यांनी जाहीर केले. यावेळी राज्य सरचिटणीस नरेंद्र जगताप, उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, सुधाकर सुर्वे, सुरेंद्र सरतापे उपस्थित होते.

नवनिर्वाचित कार्यकारिणी अशी :
कोषाध्यक्ष : गोविंदा लहामगे, सहकोषाध्यक्ष : संतोष देवरे, पूजा पवार, विनय जाधव, उपाध्यक्ष : अर्चना देवरे, जगदीश घोडके, संजय जाधव, प्रशांत रौंदळ, जितेंद्र पालवे, सहसचिव : नीलेश गवळी, मिलिंद जगताप, गणेश पवार, रवींद्र पवार, संघटक : लता परदेशी, मनोज आहिरे, अनिल बच्छाव, मुकेश पाटील, पंकज वाघ, जिजा गवळी, तपासणीस : राजेंद्र देशमाने, सचिव : किशोर ठाकूर, संपर्कप्रमुख : श्यामसुंदर जोशी, प्रसिद्धिप्रमुख : दिलीप पाटील

बातम्या आणखी आहेत...