आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारक्तदानाच्या क्षेत्रात उत्तर महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनाच्या आराेग्य विभागाकडून नाशिकच्या अर्पण रक्तपेढीचा सन्मान करण्यात आला. रक्तपेढीचे संचालक वर्षा उगावकर यांनी पुरस्कार स्वीकारला. मुंबई विभागाच्या वतीने जागतिक रक्तदान दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे गौरव करण्यात आला.
राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राहुल नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियान डॉ. रामास्वामी एन., डाॅ. साधना तायडे, डॉ. अरुण थोरात यांच्या हस्ते रक्तपेढीचा गौरव करण्यात आला. टाेपे म्हणाले की, अर्पण रक्तपेढीने थॅलेसेमियाग्रस्त मुलांना १२ वर्षांपासून नॅट टेस्टेड रक्त म्हणजे जगातील अतिसुरक्षित रक्त देऊन मुलांना रक्तसंक्रमणाद्वारे होणाऱ्या एच. आय. व्ही. व कावीळ यांसारख्या दुर्गम आजारांचे प्रमाण शून्य टक्के केले. त्यामुळे त्यांचे सुसह्य होत आहे.
वाढती आकडेवारी अशी...
अर्पण रक्तपेढीमार्फत आतापर्यंत ३०४१० नॅट टेस्टेड रक्तपिशव्या थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला, ५७१ थॅलेसेमिया जनजागृती कॅम्प घेऊन ५४२५० थॅलेसेमिया चाचणी केले. त्यातून ८१५ थॅलेसेमिया मायनर आढळून आले असून त्यांचे समुपदेशन सोसायटीमार्फत करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.