आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाज कल्याण आयुक्तांचे निर्देश:खाजगी शाळांच्या धर्तीवर समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा नामांकित होणार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण क्षेत्रात खाजगी शैक्षणिक संस्थामुळे वाढलेल्या स्पर्धेत शासकीय शाळेतील विद्यार्थी देखील मागे राहू नये म्हणून राज्याच्या समाज कल्याण विभागाने शासकीय निवासी शाळा या खाजगी शाळांच्या धरतीवर नामांकित करण्याचा संकल्प केला आहे. राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून नुकतेच त्यांनी राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची ऑनलाईन आढावा बैठक घेऊन यासंबंधीचे निर्देश दिले आहेत.

संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त व संबंधित शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नामांकित शाळेस भेट देऊन तेथील माहिती जाणून घ्यावी. खाजगी संस्थेत उपलब्ध असलेली साधन सामग्री, क्रीडांगणे, क्रीडा साहित्य व इतर सर्व साहित्य याबाबतची माहिती प्राप्त करून घ्यावी व त्या अनुषंगाने तात्काळ प्रस्ताव तयार करुन शासनास सादर करावा व चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्यापूर्वी याबाबतचे नियोजन करण्याचे आयुक्त समाज कल्याण यांनी सर्व अधिकारी यांना सूचित केले आहे.

खाजगी शाळांमधील क्रीडांगणांप्रमाणेच शासकीय शाळांमध्ये देखील क्रीडांगणे विकसित करावी जेणेकरुन चांगले खेळाडू शासकीय शाळेतून निर्माण व्हावेत हा यामागचा मुख्य हेतू आहे. त्याच बरोबर सी.बी.एस.सी अभ्यासक्रम सुरू करणे संदर्भातील नियोजन करून त्याचाही प्रस्ताव शासनास सादर करावा असे सूचित केले आहे.

विविध उपक्रम राबवणार

राज्यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटाकातील विद्यार्थासाठी 100 शासकीय निवासी शाळा कार्यरत असुन विभागाचे मंत्री धनंजय मुंडे व सचिव सुमंत भागे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व शाळा येणाऱ्या काळात नामकिंत करण्याचा विभागाने संकल्प केला आहे. त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.- डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण

बातम्या आणखी आहेत...