आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल कोश्यारींनी जिंकली मने:महिलांनी व्यक्त केली फोटो काढण्याची इच्छा, क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले 'बस इतनाही'...

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाशिक दौऱ्यामध्ये माणुसकीचे दर्शन घडविले.

नाशिकच्या जवळील लाखलगाव येथील आत्माराम दाते यांच्या बांबू शेतीला गुरुवारी (दि. 1) दिलेल्या भेटी प्रसंगी एका महिलेने राज्यपालांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. क्षणाचाही विलंब न करता राज्यपालांनी बस इतनाही असे म्हणत चक्क चिखलातून वाट काढत महिलेचा फोटो काढण्याचा हट्ट पुरविला अन् साऱ्यांची मने जिंकली..

विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांनी नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथील आत्माराम दाते यांच्या बांबू शेतीला भेट देत तेथील आगळ्यावेगळ्या शेतीची माहिती घेतली. यावेळी बांबू शेती अर्थात नैसर्गिक साधन संपदेचा उपयोग करून पुर्वीपासून मनुष्याने विकास केला आहे. आपणही निसर्गाचा मान राखून एक आगळ्यावेगळ्या शेतीची उभारणी केल्याचं कौतुक करत शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर दिली.

अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले

दरम्यान या सर्व बाबींची माहिती घेत असतानाच येथील ग्रामीण भागातील महिलांनी राज्यपालांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मात्र हे कसे शक्य असे म्हणत काही काळ दुर्लक्ष केले, पण या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेऊन असलेल्या राज्यपाल महोदयांनी स्वतःच काही अडचण आहे का, याची विचारणा केली. यावेळी महिलांना आपल्यासोबत फोटो काढायचे असल्याचे सांगितले.

उपस्थितांची मन जिंकली

असे उच्चारताच राज्यपाल कोश्यारी यांनी क्षणाचाही विलंब न करता बस इतनाही! असे म्हणत चला कुणाला फोटो काढायचा अशी विचारणा केली. लागलीच जवळच उभ्या असलेल्या महिलांकडे बोट करून तिकडे जाण्यासाठी विचारण्यात आले. राज्यपाल यांनी थेट चिखलातून मार्ग काढत उभ्या असलेल्या या महिलांच्या घोळक्यात जाऊन फोटो काढून उपस्थितांची मने जिंकली.

महिलांनी व्यक्त केली कृतज्ञता

राज्यपालांसोबत फोटो काढण्यास मिळाल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. एक क्षणाचा विलंब न करता त्यानी फोटो काढण्यास होकार दर्शविल्याने उपस्थित महिलांनी राज्यपाल कोषारी यांचे यावेळी आभार व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...