आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांविरोधात वक्तव्य केल्यानंतर नाशिकमध्ये माकप तसेच शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने निषेध आंदोलने सुरू असतानाच नाशिक दौऱ्यावर आलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या बचावासाठी उघड भूमिका घेतली. या मुद्द्यावर राज्यात लाेकभावना भडकवण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. सत्ता गेल्यापासून ते अस्तित्व टिकवण्यासाठी राज्याला वेठीस धरीत असल्याचा आरोपही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर केला. विखे यांनी नाशकात वाळू उपसा व लम्पी नियंत्रणाच्या उपाययोजनांसदर्भात बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत राज्यपालांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादाचे सर्व खापर विरोधकांवर फोडले. आहे. जनतेच्या भावनांचा आदर करून राजकीय प्रश्न सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
नाशिक जिल्ह्याची कामगिरी सुमार
नाशिक जिल्ह्यात वन विभागात अवैध खाणकाम झाल्याच्या तक्रारी अाहेत. त्या राेखण्यात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची कामगिरी समाधानकारक नाही. हे प्रकार राेखण्याची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित हाेईल.
शिंदे गटाची पाठराखण..
गुजरात निवडणूक प्रचारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्हिडिओचा वापर केल्याबद्दल विखे यांनी शिंदे गटाची पाठराखण केली. राज्यात बाळासाहेबांची शिवसेना गटाचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्याने व्हिडिओ वापरण्यात गैर काही नाही, असे ते म्हणाले.
शिर्डी लोकसभेच्या जागेचा निर्णय पक्षपातळीवर ठरेल
रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शिर्डी मतदारसंघाची मागणी केली. याचा निर्णय राज्य व पक्ष स्तरावर हाेईल. पक्षाने दिलेल्या उमेदवाराला आमचा पाठिंबा असेल, असेही विखे यांनी या वेळी सांगितले.
गुंठेवारी खरेदीला सरकारचा विरोध
अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी दगड खाणींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. वाळू उपसा आता शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार ती शासनच सामान्य विक्रीद्वारे उपलब्ध करून देईल. त्यासाठी ठिकठिकाणी डेपो लावण्यात येतील. तसेच गुंठेवारी पध्दतीमध्ये सामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याने या पद्धतीच्या खरेदीला शासनाचा विराेध आहे. अशा व्यवहारांनंतर नागरिकांना रस्ता, पाणी, सांडपाणी या समस्या भेडसावतात, याकडेही विखे यांनी लक्ष वेधले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.