आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपा भटके विमुक्त आघाडी मेळावा:शेवटच्या माणसापर्यंत शासकीय योजना पोहाेचवा ; नरेंद्र पवार

नाशिकरोड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या सर्व योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहाेचवा तसेच आगामी काळात भटके विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर काम करण्याचे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी केले.

भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नाशिकमध्ये पार पडला. या मेळाव्यात पवार बाेलत हाेते. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी रवी शिंदे, भटके विमुक्त आघाडी प्रदेश सचिवपदी राजू जाधव, भटके विमुक्त आघाडी युवा नाशिक शहराध्यक्षपदी राहुल पवार यांची निवड केली.

यावेळी उत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथ ढगे, महाराष्ट्र उपाध्यक्ष बबन मोहिते, नाशिक शहर अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रविंद्र गांगोले, शिवक्रांती वडार फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र शिंदे, भाजपा कामगार आघाडी उपाध्यक्ष महाराष्ट्र राजाभाऊ सौदे, विद्या गोसावी, दीपाली माळी, रत्ना गोसावी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...