आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत सरकार क्रिप्टो करन्सीबद्दल सकारात्मक नाही. त्यामुळे क्रिप्टो करन्सीत होणाऱ्या व्यवहारांवर सर्वात जास्त कर लादला जात आहे. करदात्यांना आयकर विवरणपत्र भरताना क्रिप्टो करन्सी व्यवहारात हाेणाऱ्या तोट्याची सवलत इतर कुठल्या उत्पन्नात घेता येत नाही. त्यामुळे करदात्यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या करन्सीची निवड करावी हे समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन माजी अतिरिक्त आयकर आयुक्त धर्मचंद पारख यांनी केले.
नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेअर व्यवहारांवरील करआकारणी आणि आयकर कायद्यांतर्गत अनिवार्य ऑडिट’ या विषयावर मार्गदर्शनपर वेबिनारमध्ये ते बाेलत हाेते.
ते पुढे म्हणाले, आयकर विवरणपत्रे भरण्याची ३१ जुलै शेवटची तारीख आहे. त्यानंतर विवरणपत्र भरल्यास आपल्याला दंड भरावा लागू शकतो तसेच आपले विवरणपत्र भरताना आपण करसल्लागारांकडे आपली आर्थिक व्यवहारांची पुरेपूर माहिती दिली पाहिजे. आयकर कायद्यातील नवीन तरतुदींची माहिती करसल्लागारांना मिळावी या उद्देशाने वेबिनारचे आयोजन केल्याची माहिती नॉर्थ महाराष्ट्र करसल्लागार संघटनचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी यावेळी दिली. नाशिक करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नितीन डोंगरे यांनी व आभारप्रदर्शन संजय निकम यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.