आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापदवीग्रहण समारंभ म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा आणि तितकाच महत्त्वाचा दिवस असतो. पदवी प्राप्त केल्यानंतर खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात होत असते. वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करताना अर्थात डॉक्टर म्हणून सेवा देताना आरोग्य सेवेला अभिप्रेत असलेला सामाजिक भाव प्रत्येकाने जोपासला पाहिजे. रुग्णसेवा हीच खरी आरोग्य सेवा म्हणून काम केल्यास एक चांगले डॉक्टर म्हणून ओळख निर्माण होईल, त्यासाठी प्रत्येकान सामाजिक बांधिलकीची जाणीव कायम जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी केले. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित पंचवटीतील केबीएच डेंटल कॉलेजमधील वर्ष २०२० आणि २०२१ मध्ये बीडीएस पदवी प्राप्त केलेल्या २०० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रघुनाथ भोये उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, विश्वस्त संपदा हिरे, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, विश्वस्त डॉ. प्रदीप जी. एल, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीनल गुळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांमध्ये के. बी. एच दंत महाविद्यालयाचे स्थान अग्रस्थानी राहिले आहे. नॅशनल रँकिंग असो किंवा विद्यापीठाचे विविध पुरस्कार महाविद्यालयास मिळाले आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे मत यावेळी समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांनी व्यक्त केले. आरोग्य विज्ञान विद्यापीठातंर्गत या पदवीग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २०२० आणि २०२१ मध्ये पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.