आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसील कार्यालय आवारात गोंधळ:ग्रामपंचायत निवडणूक ; छाननीत ५ अर्ज अवैध

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकांचा आखाड रंगला आहे. त्यातील नाशिक तालुक्यात १६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत असून नुकतीच छाननीची प्रक्रिया पार पडली. यात ३०६ पैकी ५ अर्ज बाद झाले असून यात सर्वाधिक दुगाव ग्रामपंचायतीच्या तीन अर्जांचा समावेश आहे. यावेळी महिला उमेदवाराचा अर्ज पतीच्या अतिक्रमणाची तक्रार करण्यात आल्याने तहसीलदारांनी बाद केल्याने काही काळ नाशिक तहसील कार्यालय आवारात गोंधळ झाला होता.

पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती निवळली. कोरोना काळात रखडलेल्या आणि मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून सदस्य पदांसाठी ३०१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सरपंच पदासाठी ७१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.

बातम्या आणखी आहेत...