आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाकाळात आजाेबा वारंवार घराबाहेर जात असल्याने नातवाने त्यांना घरात साखळीने बांधून ठेवले होते. आजाेबांनी याची पोलिसांत तक्रार दिली हाेती. त्याचा राग आल्याने नातवाने आजोबांचा खून करून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दोन दिवसांपूर्वी ओढा गावातील नाल्यात तोंडाला चिकटपट्टी आणि हातपाय साखळीने बांधलेला मृतदेह सापडला होता. आडगाव पोलिस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रघुनाथ श्रावण बेंडकुळे (७०, रा. धोंडेगाव) असे या खून झालेल्या वृद्धाचे नाव असून अटक केलेल्या नातवाचे नाव किरण निवृत्ती बेंडकुळे आहे. दोन दिवसांपासून या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एका जागरूक नागरिकाने हा मृतदेह धोंडेगाव येथील व्यक्तीचा असल्याची माहिती दिली. याआधारे तपास सुरू करत माहिती गोळा करण्यात आल्यानंतर संशयित नातू किरण याने आजोबांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख, हेमंत तोडकर, सुरेश नरवाडे, दशरथ पागी, यांच्या पथकाने उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
पोलिस कारवाईचा होता राग
आजोबांना घरात साखळीने बांधून ठेवल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी नातू किरणवर कारवाई केली होती. याचा राग मनात धरून आजोबांचा घरात खून करून मृतदेह कारमध्ये टाकून किरणनेे मृतदेह ओढा गावातील नाल्यात फेकून दिला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.