आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रमही:वाचनसंस्कृतीला साद घालणारा ‘ग्रंथाेत्सव’ ; वाचक आणि पुस्तकप्रेमींसाठी आज आणि उद्या पर्वणी

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाशिक ग्रंथोत्सव २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. २४) मु. शं. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे यांनी दिली आहे.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी, कविसंमेलन, मान्यवरांची व्याख्याने, मन:शक्ती संगीत असे विविध कार्यक्रम हाेणार आहेत. तसेच विविध ग्रंथ व साहित्य प्रदर्शन व विक्री या दोन्ही दिवशी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असणार आहे. ग्रंथोत्सवास शहरातील नागरिक व ग्रंथप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी केले आहे.

विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ग्रंथदिंडी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व सावानाचे अध्यक्ष दिलीप फडके यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. २४) सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार आहे. सावाना, रेडक्रॉस सिग्नल, धुमाळ पॉइंट, चांदीचा गणपती, मेनरोड, मुंदडा मार्केटमार्गे ग्रंथदिंडी पुन्हा सावानात येईल. या ग्रंथदिंडीत शाळा, महाविद्यालये, अधिकारी, कर्मचारी व ग्रंथप्रेमी वाचक सहभागी होणार आहे.

ग्रंथाेत्सवात मिळणार कविसंमेलन, व्याख्यान अन‌् संगीत कार्यक्रमाचीही मेजवानी {उद्घाटन : केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. २४) सकाळी १० वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृहात उद्घाटन हाेणार आहे. {कविसंमेलन : ज्येष्ठ कवी विजयकुमार मिठे यांच्या उपस्थितीत दुपारी ३ ते ४ यावेळेत निमंत्रित कवींचे संमेलन {व्याख्यान : शुक्रवारी (दि. २५) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ‘वाचनसंस्कृती व ग्रंथांचे महत्त्व’ या विषयांवर डॉ. शंकर बोऱ्हाडे व डॉ. दिलीप धोंगडे यांचे व्याख्यान हाेणार आहे. {संगीत : गायक व संगीतकार संजय गिते हे शुक्रवारी (दि. २५) दुपारी २ ते ४ या वेळेत व्यक्तिविकास, तणावमुक्तीसाठी मन:शक्ती संगीत {समारोप : सायंकाळी ५ वाजता समारोप कार्यक्रमास जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, उपसंचालक डॉ. राजेंद्र गाडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...