आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Graphite India Instead Of Building A Cement Tank; Vinayaknagar Became Tanker Free With The Help Of Lions Club Of Nashik Star |marathi News

टँकरमुक्त:सिमेंटची टाकी बांधण्याएवजी ग्राफाईट इंडिया; लायन्स क्लबऑफ नाशिक स्टारच्या मदतीने विनायकनगर बनले टँकरमुक्त

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लबऑफ नाशिक स्टारच्या मदतीने गणेशगाव टँकरमुक्त बनलेआहे. या ठिकाणी दगड, विटा सिमेंटची टाकी बांधण्याएवजी ग्राफाईट इंडिया या कंपनीची दहा हजार लिटरची पाण्याची टाकी बसविण्यातआली. या पाण्याच्या टाकीचे वजन १४०० किलोआहे. विशेष म्हणजे, कमी खर्चात बसविण्यातआलेली या टाकीचेआयुर्मान तब्बल ९९ वर्षे इतकेआहे. या पाण्याच्या टाकीमुळे महिलांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलाआहे.

विनायकनगर येथे १५०० लोकवस्ती आहे. या वस्तीवर पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने पाणीप्रश्न बिकट बनला होता. त्यामुळे महिलांना तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सार्वजनिक विहिरीतून हंड्याद्वारे पाणी आणावे लागत होते. लहान मुले आणि महिलांची ही पायपीट बघून लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारने या गावातील महिलांना कायमस्वरुपी पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दहा हजार लिटर पाण्याची टाकी बसविली. या ठिकाणी विजेची सुविधाही उपलब्ध नसल्याने सुरुवातीला महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीज पुरवठा सुरळीत केला.

घराघरात पाणी पोहचविण्यासाठी पाइप व नळ यांची सुविधा उपलब्ध केली. पाण्याची टाकी नेण्यासाठी जयश्री रोडलाइन यांनी वाहतुकीची व्यवस्था करून दिली. गावकऱ्यांनी पुढाकार घेत यासाठी मदत केली. या पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा रामकृष्ण आरोग्य संस्थेचे संस्थापक श्रीकंठानंद स्वामींच्या हस्ते झाला. या पाण्याच्या टाकीसाठी क्लबने पावणे दोन लाख रुपयांची मदत केली. यासाठी लायन्सचे जिल्हा प्रांतपाल हेमंत नाईक, लायन्स क्लब ऑफ नासिक स्टारच्या अध्यक्षा सारिका कलंत्री, सचिव अभय पाटील, खजिनदार अश्विनी बाग यांनी यासाठी विशेष लक्ष देऊन मेहनत घेतली. संतोष कलंत्री, प्रशांत भरबत, राम डावरे, सरपंच रुक्मिणी नथु उदार, नितीन मराठे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...