आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओझर:नाशिक विमानतळाच्या रनवेजवळ गवताला आग

ना‍शिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हद्दीतील नाशिक विमानतळावरील रनवेच्या १०० मीटर अंतरावरील जवळपास ५० एकर परिसरातील वाळलेल्या गवताला शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आग लागली. एचएएलचे ३ अग्निशमन बंब आणि पिंपळगाव बसवंत, सिन्नर, नाशिक, येवला येथील प्रत्येकी १, तर एअरफोर्स येथील २ अग्निशमन बंबांच्या आधारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. लढाऊ विमानाची निर्मिती एचएएलमध्ये होते. ‘सुखोई’ या लढाऊ विमानासाठी लागणाऱ्या सहा नंबर रडारपासून चिंधादेवी गेटच्या बाजूने ही आग लागली होती.

२ तासात आग आटोक्यात दोन तासांपूर्वी नाशिकच्या एअरफोर्स परिसरात अचानक वणवा पेटला. बघता बघता वणवा हजारो हेक्टरवर पसरला. आगीने रौद्ररूप धारण केले होते. जवळच विमानतळ असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. आगीचे रौद्ररूप पाहता नाशिकच्या आसपासच्या अग्निशमन गाड्याही घटनास्थळी रवाना केल्या. अग्निशमन दलाने २ तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी वा वित्तहानी झाली नाही. विमानतळाला कोणत्याही प्रकारचा धोका झाला नाही. दरम्यान, आग कशामुळे लागली व किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

बातम्या आणखी आहेत...