आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेणताही पुरस्कार देताना कला क्षेत्राशी तादात्म्य पावणारी वृत्ती असावी लागते. अहंकारी भूमिका न घेता चांगले काम करत राहणे ही वेगळीच मानसिकता, वृत्ती आणि धारणा असते अशी धारणा घेऊन बाबाज् थिएटरच्या प्रशांत जुन्नरे यांच्यात निरपेक्षा भावेनेचे व्रत दिसत असल्याचे काैतुकाेद्गार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी काढले.
बाबाज् थिएटरतर्फे प. सा. नाट्यगृहात कलाकारांप्रती कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येताे. या महिन्यात उल्हास ऊर्फ भाऊ तांबे, अविनाश धर्माधिकारी आणि आनंद ओक यांना हा पुरस्कार प्रा. फडके यांच्या हस्ते प. सा. नाट्यगृहात साेमवारी झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी विश्वास ठाकूर, विनायक रानडे, एन. सी. देशपांडे, जे. पी. जाधव, श्याम केदार, मधुकर झेंडे आणि प्रशांत जुन्नरे व्यासपीठावर उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रितीश कुलकर्णी यांनी केले.
यानंतर प्रांजली बिरारी-नेवासकर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. प्रांजली यांनी ऋतू हिरवा, जाईजुईचा गंध मातीचा, बाेले रे पहिरा, घनरानी, अधीर मन झाले, भिगी भिती राताे मे, चिंब भिजलेले अशी गाणी सादर केली. तर इक लडकी भिगी भागी सी, लगी आज सावन की, कधी तू, गारवा, रिमझिम गिरे सावन, हिरवा निसर्ग ही गाणी संदीप थाटसिंगार यांनी सादर केली. तसेच स्नेहा रत्नपारखी, मानसी पाटील, अदिती माेरे यांनीही विविध गाणी सादर करत दाद मिळविली. अमाेल पाळेकर अनिल धुमाळ, जय भालेराव, महेश कुलकर्णी, स्वरांजय धुमाळ, देवानंद पाटील, शुभम जाधव यांनी वाद्यांवर साथसंगत केली. स्नेहा रत्नपारखी यांनी निवेदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.