आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेचे जतन करणाऱ्या गांधर्व महाविद्यालयाचा उपकम:स्वर, ताल, नृत्यातून गुरुंप्रति कृतज्ञता; गायनाने मैफल रंगली

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरूप्रती आदर व्यक्त करताना गुरूंनी जे शिकवलं तेच त्यांच्यापुढे मांडून आम्ही वारसा जपत आहाेत ही अनुभूती जुन्या काळापासून कलेचे जतन करणाऱ्या गांधर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अधाेरेखित केली. शिष्यांनी स्वर, ताल आणि नृत्यातून गुरू स्मरण केले. तबला, सतार, गायन, हार्मोनियम, व्हायोलिन याच्या वादनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.

प. सा. नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला उस्ताद राशिद खाँसाहेब यांचे शिष्य प्रसाद खापर्डे व मुंबई येथून निवृत्त झालेले माजी पोलिस आयुक्त धनराज दायमा प्रमुख पाहुणे होते. किराणा घराण्याच्या गायिका संगीता सिमेरिया यांचीही विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला हाेती. गांधर्व महाविद्यालयाचे कमलाकर जोशी यांनी उपस्थितांचा सन्मान केला. मोना पुजारी यांनी कथक नृत्यातून गणेशवंदना सादर केली. किराणा घराण्याच्या गायिका संगीता सिमेरीया यांनी गायन मारू बिहाग सादर केला. निकिता नखाते हिने ‘गुरू एक जगी त्राता’ हे गीत सादर केले. हार्मोनियमवर प्रणव पाठक याने आरती सादर केली. त्याला प्रांजल पाठक हिने साथसंगत केली. एकल तबला वादनात अर्णव पवार याने झपताल, गौरव शिंदे याने तीनताल सादर केला.

समूह तबलावादनात ताल तीनताल, विद्यालयातून तबला विशारद झालेले विद्यार्थी अनुराग जोशी, सचिन भालेराव, जितेंद्र धर्माधिकारी यांनी पंचमसवारी ताल सादर केला. सुरेंद्र जालिहालकर व शिष्य अद्विका सोनवणे, सागर पावटे, सौरभ बोकील, मृण्मयी कारीकर यांनी समूह व्हायोलिन वादनात दुर्गा राग सादर केला. एकल व्हायोलीन वादन चिन्मयी जोशी हिने राग हंसध्वनी, सतारवादन क्षितिजा शेवतकर हिने कौशीकानडा राग सादर केला, सर्वज्ञ दसरे, श्रुती लोले, अर्णव इनामदार, कौस्तुभ राऊत, हनुमान ढोणे, मृण्मयी बागूल, मयुरी शहाणे, प्रियंका शिंदे, वेदांत दिवटे, प्रसाद घोटेकर,मच्छिंद्र अहिरे, आर्यन कुलकर्णी, सुमेध इतनारे, अद्विका सोनवणे, सागर पावटे, मृण्मयी कारीकर, सौरभ बोकील या सर्व विद्यार्थ्यांच्या गायन, वादनाने मैफल बहरत गेली. सांगता कमलाकर जोशी यांनी सतारीवर वाजवलेल्या राग जनसंमोहिनीने झाली. वाद्यांची साथसंगत नकुल दायमा, शुभम तायडे, जितेंद्र धर्माधिकारी, गौरव शिंदे, सचिन भालेराव यांनी केली. सूत्रसंचालन अलका चंद्रात्रे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...