आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना सल्ला:महाराष्ट्रासाठी मराठी माणसांचे मोठे योगदान; राज्यपालांच्या विचाराशी सहमत नाही, बोलताना काळजी घ्या

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रासाठी मुंबईच्या विकासासाठी मराठी माणसांचे मोठे योगदान आहे. मराठी माणसांच्या योगदानामुळेच मुंबई आर्थिक राजधानी बनली. 106 हुतात्माच्या आपले जीव गमावले आहेत. बाळासाहेबांनी यासाठी मोठे योगदान दिले आहे. राज्यपालांच्या विचाराशी आम्ही सहमत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोश्यारींच्या मतावर असहमती दर्शवली. सोबतच राज्यपालांनी बोलताना काळजी घ्यावी, असा सल्लाही दिला.

बाळासाहेबांची भूमिका तीच आमची

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी माणूस सोडून मुंबई कुणालाही देता येणार नाही. कितीही संकटे आली तरी मुंबई थांबत नाही. बाळासाहेबांच्या भूमिका हीच आमची भूमिका आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यपालांनी कुणाची अवहेलना होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. मराठी माणसाला न्याय हक्क देण्यासाठीच शिवसेना स्थापन केली आहे. राज्यपालाचांही अवमान करण्याचा हेतू नसल्याचे ते म्हणाले.

मालेगाव जिल्ह्यासाठी सकारात्मक

मालेगाव जिल्हा निर्मितीची मागणी जुनीच असून त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. आमदार दादा भुसे, सुहास कांदे यांच्या मागणीचा आपण सकारात्मक विचार करत आहोत. लोकांच्या हितासाठी आपण काम करणार आहोत. त्यासाठी मुंबईत बैठक घेत फायदे आणि तोटे जाणून घेऊ. शासनाकडून प्राध्यान्याने हा मुद्दा मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करूयात, असेही त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीचा घेतला आढावा

शिंदे - फडणवीस सरकारने लोकहिताचे निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले. ते नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत सर्व विभागाचा आढावा घेतला असून रस्त्याच्या विकासावर लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अतिवृष्टीचा आढावा घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...