आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये फर्निचरमॉलसह भंगार बाजाराला आग:कामगारांनी पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली; आगीमध्ये लाखोंचे नुकसान

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहराजवळील वडनेर-पाथर्डी रस्त्यावरील एका फर्निचर दुकानासह त्या शेजारी असलेल्या भंगार मालाच्या गोदामाला आज (3 नोव्हेंबरला) पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी मॉलमध्ये झोपलेले 15 ते 20 कामगार सुदैवाने वेळीच जागे झाल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या आगीमध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे.

आगीवर नियंत्रण आणण्यात यश

सदरील आगाचे वृत्त समजताच अग्निशामक दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतल्याने दीड ते दाेन तासात आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले. याप्रकरणी इंदिरानगर पेलिस ठाण्यात अकस्मात आगीचे नाेंद करण्यात आली असून पंचनामा व चाैकशी सुरू आहे.

काय आहे घटना?

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडनेर दूमाला रोडवर पहाटे तीन वाजेच्या सुमारास एम के फर्निचर मॉल आणि गोदामाला अचानक आग लागली. आगीने प्रचंड रौद्ररुप धारण केले. लाकडी साहित्य असल्यामुळे आगची भडका उडाला. फर्निचर मॉल आणि गोदाम आगीच्या भक्षस्थानी सापडले. आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली की, दुकानाच्या बाजूला असलेली चार ते पाच घरांना हानी पोहोचली. वाहनेही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सदर गोदामाला आग लागल्यानंतर धुराचे लाेट पसरताच पहाटेच्या साखर झाेपेत असलेल्या पंधरा-वीस कामगार व कुटूंबियांनी बाहेर पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली. अवघ्या काही मिनिटात आगीने परिसरातील फर्निचरच्या वस्तूसह इतर साहित्याने पेट घेतल्याने आगीचे लाेट पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एका पाठाेपाठ एक अशा आठ ते दहा बंबांच्या मदतीने जवनांनी आगीवर नियंत्रण मिळविले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

भंगार गाेदाम हटविण्याची मागणी

दरम्यान, ही आग फनिर्चर माॅलला लागली असली तरी या गाेदामाच्या लागून असलेल्या ठिकाणी अनाधिकृत भंगार बाजार वसला असून ताे हटविण्याची वारंवार स्थानिक रहिवाश्यांकडून मागणी केली जात आहे. तरीही त्याकडे मनपा प्रशासनासह पाेलिस यंत्रणांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने रहिवाश्यांनी आगाीच्या घटनेवरून संताप व्यक्त करीत मनपा प्रशासन अजून किती माेठी दुर्घटना हाेण्याची वाट बघणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...