आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृहात अभिवादन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेहरू उद्यानासमोरील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी वसतिगृहाचे सचिव पी. के. गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून उषा बुकाने व चंद्रकांत बुकाने उपस्थित होते. अधीक्षिका बेबी डेर्ले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी विद्यार्थिनी ऋतुजा जगताप हिने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून ‘मी सावित्री बोलतेय’ हे एकपात्री नाटक सादर केले.

विद्यार्थिनींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याबद्दलचा पोवाडा सादर करून अभिवादन केले. बालिका दिनानिमित्ताने सर्व मुलींना बुकाने यांच्यातर्फे केळी वाटप करण्यात आली. याप्रसंगी सुजाता भालेराव, रंजना देवरे, सुरेखा पवार, शोभा कर्डक व वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...