आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:माजी मंत्री दौलतराव आहेर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको विभागातील खुटवडनगर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री दौलतराव आहेर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रभाग क्रमांक २६ मध्ये भाजपचे शहराध्यक्ष कैलास आहिरे, माजी नगरसेविका अलका आहिरे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी दौलतराव आहेर यांच्या कार्याची माहिती दिली. भाजपाचे ज्येष्ठ नेते उखाजी चौधरी, सिडको मंडळाचे पदाधिकारी महेश कुलकर्णी, गुलाब पाटील, रोशन मुखेकर व प्रभागातील पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री असताना दाैलतराव आहेर यांनी केलेली विकासात्मक कामे महत्त्वाची हाेती, असे कैलास आहिरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...