आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण महोत्सव:रॉबिनहूड वाटणार 50 हजारांना किराणा

इंदिरानगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रॉबिनहूड वाटणार 50 हजारांना किराणारॉबिनहूड आर्मी कडून १५ ऑगस्टला स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने आदिवासी पाड्यांवर जाऊन ५० हजार लोकांना पुरेल एवढा किराणा वाटप केला जाणार आहे. याकरीता राॅबिनहूड आर्मी सक्रिय झाली असून ४०० स्वयंसेवकांकडून शहरात पाच सेंटर्सवर याकरिता मदत स्वीकारली जात आहे.

जगभरात राॅबिनहूड आर्मी सक्रिय असून नाशिकमध्ये बिल्डर, डाॅक्टर, इंजिनिअर यांसारख्या विविध क्षेत्रांतील तरुण एकत्र येऊन यात चारशेवर स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत. शहरातील मंगल कार्यालये, लाॅन्स येथे विविध समारंभात उरलेले अन्नपदार्थ ‘फूड व्हॅन’द्वारे संकलित करून ते झाेपडपट्ट्यांमध्ये वितरीत केले जाते, यामुळे ताजे व गरज अन्न भुकेल्यांपर्यंत पाेहाेचविले जात आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर संपूर्ण भारतात ७५ लाख लोकांना जेवण वाटणार आहे. याचाच भाग म्हणून नाशिकमध्ये ७५ लोकांच्या सक्षमीकरणासाठी संस्थेच्या वतीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत.

नागरिकांना येथे काॅल करून पाेहाेचवता येईल मदत
शहरात पाच सेंटर्सवर किराणा संकलित करण्यात येत असून, यात अगदी एक किलाेपासून आपली क्षमता असेल तितका किराणा दान देता येणार आहे. ५० हजार लोकांना पुरेल एवढा किराणा वितरीत करण्याचे माेठे उद्दिष्ट डाेळ्यासमाेर ठेवण्यात आलेले आहे. या उपक्रमात दानशूरांनी किराणा देऊन किंवा स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी १५ ऑगस्टपूर्वी इंदिरानगर, द्वारका येथे ८२३७८८१३३६, पंचवटी ७७६८८५३३७९, सातपूर ८०५५९६६०६९, नाशिकरोड, ९०२१३४६६२१, सिडको ७४४७४६६६०० येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...