आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समूह राष्ट्रगीत गायन:विभागीय आयुक्तालयासह विविध कार्यालयांत समूह राष्ट्रगीत गायन

नाशिकरोड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य सप्ताहांतर्गत समूह राष्ट्रगीत गायन विभागीय आयुक्त कार्यालयासह नाशिक शहरात विविध कार्यालयांत पार पडले. विभागीय आयुक्तालयात सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी अपर आयुक्त भानुदास पालवे, सामान्य प्रशासन उपायुक्त रमेश काळे, पुनर्वसन उपायुक्त उन्मेष महाजन, नियोजन उपायुक्त प्रदीप पोतदार आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालयास जाहीर झालेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्काराच्या रकमेतून उभारलेल्या पिण्याच्या पाण्याची शुद्धीकरण यंत्रणा व वाॅटर कूलर संचाचे उद्घाटन गमे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...