आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसेवा कराच्या प्रकरणांचा प्रस्तावित न्याय निवाडा प्रकरणे ऑनलाईन सोडवू:महाराष्ट्र चेंबरला जीएसटी अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त निलंक कुमार व उपायुक्त ओम गीर यांना निवेदन महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख समवेत कमिटीचे को. चेअरमन सी एस सिंग, जे एन पांडे, अनिल सहानी. - Divya Marathi
जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त निलंक कुमार व उपायुक्त ओम गीर यांना निवेदन महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख समवेत कमिटीचे को. चेअरमन सी एस सिंग, जे एन पांडे, अनिल सहानी.

उपसेवा कराच्या प्रकरणांचा प्रस्तावित न्यायनिवाडा दूरच्या ठिकाणी न ठेवता स्थानिक अधिकार क्षेत्रात करण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त निलंक कुमार व उपायुक्त ओम गीर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

अतिरिक्त आयुक्त निलंक कुमार व उपायुक्त ओम गीर यांनी अडचणी समजून घेऊन उपसेवा कराच्या प्रकरणांचा प्रस्तावित न्याय निवाडा प्रकरणे ऑनलाईन सोडविण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

याप्रसंगी उपाध्यक्ष सुधाकर देशमुख व लॉजिस्टिक कमिटीचे को चेअरमन सी एस सिंग यांनी नाशिक जिल्ह्यातील अनेकांना ऑक्टोबर आणि डिसेंबर 2020 मध्ये आयकर माहिती आणि वॅट माहिती याच्या आधारावर कारणे दाखवा नोटीस मिळाल्या आहेत, त्याला काही सदस्यांनी खूप पूर्वी उत्तरही दिले आहे तरी आत्ता या सदस्यांना नोटीस प्राप्त झाल्या आहेत.

त्यांच्या प्रकरणांचा निर्णय नाशिक आयुक्तालयाबाहेर नागपूर भंडारदरा, वर्धा, अमरावती याठिकाणी स्थलांतरित केला असून तेथे वैयक्तिक सुनावणीस उपस्थित राहण्याचे पत्र देण्यात आले आहे. नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रकरणांचा न्यायनिवाडा स्थानिक स्तरावरच करण्यात यावा कारण इतरत्र दूरच्या ठिकाणी वैयक्तिक उपस्थित राहणे शक्य होत नाही व त्रासदायक असल्याने न्यायनिवाडा स्थानिक स्तरावर करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली.

बातम्या आणखी आहेत...