आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरअखेरपर्यंत अनुकंपा भरतीची प्रक्रिया:पालकमंत्री दादा भुसे यांची बैठकीत बैठकीत माहिती

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार नोकऱ्या देण्याचा शासनाचा मानस असून त्यातील अनुकंपा भरती हा अत्यंत संवेदनशील व प्राधान्याचा विषय आहे. डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत अनुकंपा भरतीची प्रक्रिया व २६ जानेवारी २०२३ रोजी नियुक्तीपत्रे दिले जातील. असे अश्वासन पालकमंत्री दादा भूसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा भरतीबाबात आढावा घेताना बैठकीत भूसे यांनी अनुकंपा धारकांना दिलासा दिला. ते म्हणाले, प्रत्येक विभागाने आपल्या रिक्त पदांचा आढावा घेवून अनुकंपाच्या नियुक्तीची पदे निश्चित करावी. उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करून घोषित करावी. प्रत्येक विभागाने आपल्याकडील अनुकंपाची रिक्त पदे शैक्षणिक आर्हतेनुसार तपासून तातडीने भरावीत. जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्यासह सर्वच विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...