आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांनी घेतला आढावा:नाशिक स्मार्ट सिटीच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी; ड्रेनेजचे पाणी प्रक्रिया करूनच गोदापात्रात सोडण्याचे आदेश

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहर हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. हे ऑटोमोबाईल हवामानातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. तसेच नाशिक शहर हे ऐतिहासिक शहर असल्याचे महत्त्व दिले गेले आहे. शहर स्वच्छ व सुंदर असल्याशिवाय तसेच पौराणिक महत्व असलेल्या रामकुंडात स्वच्छ पाणी आल्याशिवाय नाशिक शहर स्मार्ट सिटी होणार नाही. त्यामुळे नाशिक शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासोबतच शहरातील ड्रेनेजचे पाणी प्रक्रिया केल्याशिवाय गोदावरी नदी पात्रात जाताच कामा नये असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

भुजबळ यांनी नाशिक शहरातील विविध ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण झालेल्या व सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी नाशिकचे महापालिका आयुक्त रमेश पवार, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, महापालिका उपायुक्त मनोज घोडे पाटील, देविदास भालेराव, स्मार्ट सिटीचे प्रकल्प संचालक दिग्विजय पाटील, किसन कानडे उपस्थित होते.

नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली असतांना, त्यांनी महात्मा फुले कलादालन येथील प्रदर्शन हॉल व ऑडिटोरियम हॉल, नेहरू गार्डन येथील स्मार्ट सिटी अंतर्गत सद्यस्थितीत झालेले काम, रामवाडी व रामकुंड येथील गोदा प्राजेक्टचे सुरू असलेले कामे, पंचवटी मोटार डेपो येथील व कामे, पंडित पलुस्कर सभागृह ऑडोटोरियमची कामे व दहीपूल येथील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. व त्यांनी या स्मार्ट सिटी मध्ये नवीन काय काय करता येईल हे देखील भूजबळांनी सांगितले.

शहराची नियमित स्वच्छता करावी - छगन भुजबळ
संपुर्ण शहराटी पाहणी केल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, महात्मा फुले कलादालन येथील प्रदर्शन हॉलसह ऑडीटोरियम येथे कॅन्टिनसह अद्यावत व आकर्षक सेवा सुविधा सुरू करणे अनिवार्य आवश्यक आहे. नागरिकांना या प्रकल्पाची माहिती होण्यासाठी त्याची जाहिरात करून ही वास्तू संगीत कार्यक्रम, प्रदर्शनासाठी उपयोगात आणावी. नेहरू गार्डनसह सर्व प्रकल्पांची नियमित स्वच्छता देखभाल दुरूस्ती करून तेथे असलेल्या महापुरूषांच्या पुतळ्यांना आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात यावी.

दरम्यान दहिपुल परिसरात प्रत्येक वर्षी पावसाचे गढुळ पाणी साचते. व याचा शहरातील नागरिकांना त्रास होतो, तसेच नुकसान देखील होते. हे सर्व टाळण्यासाठी हा संपुर्ण परिसर समतल करून पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीने अद्यावत व कायमस्वरूपी उपाययोजना करावी. तसेच गोदावरी पात्रात सिमेंट काँक्रीटचे कामे होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी स्मार्ट सिटी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...