आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुरघाेडी टळली:पालकमंत्री - आमदारांची अखेर नाशिक विकासासाठी युती तीनवेळा रद्द झालेली बैठक आज

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक नव्हे तर तब्बल तीनवेळा नानाविध कारणामुळे रद्द झालेली नाशिक महापालिका क्षेत्रातील विकास याेजनांची बैठकीला अखेर गुरुवारी मुहूर्त सापडला असून मुंबईऐवजी ही बैठक आता नाशिक महापालिकेतच हाेणार आहे.

विशेष म्हणजे, दाेनवेळा भाजप आमदारांना टाळण्याचा झालेला प्रयत्न, यासंदर्भात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेल्या तक्रारी यापार्श्वभुमीवर संभाव्य कुरघाेडी तिसऱ्यांदा टळली असून पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून भाजपाच्या शहरातील तिन्ही आमदारांना बैठकीसाठी निमंत्रण धाडल्यामुळे त्यांची नाशिक विकासाची युती चर्चत आली आहे.

शिंदे गटाच्या विस्तारासाठी पालकमंत्री दादा भुसेच मैदानात उतरले आहेत. पालकमत्री भुसे यांनी गेल्या महिन्यात 21 ऑक्टोबर रोजी मुंबईत महापालिकेची बोलविलेली विशेष बैठक आता गुरुवार (03) पालिकेत बोलवली आहे. या बैठकीत गावठाणात क्लस्टर, झोपडपट्टी पुर्नविकास अर्थात एसआरए, सिडकोतील 28 हजार घरे फ्री हाेल्ड करण्यासह महत्वाच्या विषयांवर चर्चा हाेणार आहे. दरम्यान, पालिकेतील बैठकांना भाजप आमदारांना दूर ठेवणाऱ्या भुसेंनी प्रथमच भाजपच्या तीनही आमदारांना बैठकीसाठी आमंत्रण दिले असल्याने भुसेंनी भाजप आमदारांसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यात पाच आमदार असल्यामुळे भाजपाचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्याकडेच पालकमंत्रीपद जाईल अशी अटकळ हाेती. ध्वजवंदनाचा मानही महाजन यांना मिळाल्यामुळे भाजपाचा हुरूप वाढला हाेता मात्र दुय्यम खाते दिल्याच्या मुद्यावरून भुसे यांना खुश करण्यासाठी पालकमंत्रीपद दिले गेले. त्यानंतर त्यांनी 30 सप्टेंबरला नाशिक महापालिकेत बैठक घेत शहर विकासाचा आढावा घेताना भाजपाला खासकरून फडणवीस यांनाच लक्ष्य केल्याचे उघड झाले. एवढेच नव्हे तर भाजपाची पालिकेत सत्ता असल्यामुळे त्यांच्याच आमदार व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलल्यामुळे नाराजीचा सुर उमटला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात दाेनवेळा बैठकीचे आयाेजन केले गेले मात्र त्यापैकी एकाच बैठकीला भाजप आमदारांना निमंत्रण हाेते.

सुदैवाने या दाेन्ही बैठकी न झाल्यामुळे संघर्ष टळला हाेता. त्यानंतर भुसे यांनी मुंबईत 17 ऑक्टोबरला ठरले मात्र अन्य कार्यक्रमातच वेळ गेल्यामुळे ही बैठकदेखिल हाेवू शकली नव्हती. नाशिकसंदर्भात महत्वाची बैठक घेण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याचे चित्र असताना गुरूवारी पालिकेत बैठकीचा मुहूर्त अखेर निघाला.

या विषयांवर होणार चर्चा

  • सिंहस्थ कुंभमेळा आराखडा तयार करणे
  • 28 हजार सदनिका फ्री होल्ड करणे
  • गोदावरीची पुररेषा नव्याने निश्चित करणे
  • पंचवटी,सिडकोत नवीन हॉस्पीटल तयार करणे
  • नोकरभरतीसाठी सुधारीत आकृतीबंध मंजूरीसाठी पाठपुरावा
  • एकलहरे परिसरात 87 एकर जागेत चित्रनगरी
  • मेट्रो, स्मार्ट सिटीच्या प्रलंबित कामांचा आढावा
  • सिडको, पंचवटीत 200 खाटांचे नवे रुग्णालय
  • घरपट्टीच्या वाढीव दरांचे पुनर्विलोकन करणार
बातम्या आणखी आहेत...