आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या विरोधात सक्तीची वसुली मोहीम सुरु केली आहे. या कारवाई विरोधात विविध शेतकरी संघटना एकत्रित येवून पालकमंत्री दादा भुसे यांच्या दारासमोर बिऱ्हाड मोर्चाचे १६ जानेवारीला आयोजन केले आहे.
या मोर्चाच्या नियोजनासाठी १ जानेवारी रोजी निफाड येथे बाजारसमितीच्या कार्यालय येथे रविवारी सकाळी ११ वाजता शेतकरी संघटनांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बाेराडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागात सुरु असलेल्या पदवीधर संघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहितेचे पालन करुन बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या मोर्चाला जिल्ह्यातून सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी आपल्या कुंटूबासह हजर राहावे यासाठी गावागावात जाऊन जनजागृती करणार असल्याचे बोराडे यांनी सांगितले.
या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे राजेंद्र डोखळे, स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, प्रहार संघटनेचे जयेश जगताप, आप चे उत्तम निरभवणे, शेतकरी संघर्ष संघटनेचे सुधाकर मोगल, रामकृष्ण बोबंले, संतू पाटील बोराडे, भाऊसाहेब भंडारे, दगु गव्हारे यांच्यासह आदी उपस्थित होते.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी सतत तगादा लावला आहे. परंतु या बँकेतून होत असलेल्या वसुली बाबत राजकीय पुढार्यांच्या माध्यमातून भेदभाव केला जात असून बड्या माशांना सोडून अल्प कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे दिसून येत आहे.मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे.शासनाला जाग यावी तसेच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री दादा भुसे यांच्या दारासमोर बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे असे शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.