आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना व मंडळांना अडचणींचा सामना:भालेकर मैदानावरील पाळणे काढले, दुकाने तशीच

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बी. डी. भालेकर मैदान आणि आताच्या वाहनतळाच्या जागेवर होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी छोटे पाळणे लावण्याची परवानगी घेऊन मोठे इलेक्ट्रिक रहाटपाळणे लावल्याने मंडळांकडून आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्याची दखल घेत पालिकेकडून पाळणे हटविण्यात आले. मात्र, खाद्यपदार्थांची दुकाने तशीच असल्याने या ठिकाणी नागरिकांना व मंडळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गणेशाेत्सवाच्या शेवटच्या तीन दिवसांत भालेकर मैदानावर देखावे बघण्यासाठी गर्दी होत असल्याने या ठिकाणी असलेले दुकाने हटविण्याची मागणी मंडळांकडून करण्यात आली आहे. दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होऊ शकला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने निर्बंध हटविल्याने यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यानुसार नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उंच गणेशमूर्तींबरोबरच देखावे आणि आरासही भव्यदिव्य उभारल्या आहेत. बी. डी. भालेकर मैदानावरील सात सार्वजनिक गणेश मंडळेही त्यास अपवाद नाही. या ठिकाणी नाशिककर मोठ्या प्रमाणावर आरास पाहण्यासाठी गर्दी करत असतात. चालायलादेखील जागा रहात नाही, अशी स्थिती शेवटच्या सात दिवसांची असते. अशा भाऊगर्दीत दुकानांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...