आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी संघर्षाला धैर्याने सामोरे जावे:गीतिका कांबळी यांचे सीआयआयच्या आयडब्ल्यूएन सत्रात मार्गदर्शन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांसाठी प्रत्येक दिवस हा एक नवीन संघर्ष घेऊन येत असतो. याप्रसंगी महिलांनी आपली शक्ती ओळखत संघर्षाला धैर्याने सामोरे जायला हवे. तसेच त्यांनी वित्त व उद्योजकता या विषयांचा आवर्जून अभ्यास करावा असे प्रतिपादन महाराष्ट्र सीआयआयच्या चेअरमन गीतिका कांबळी यांनी केले.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) तर्फे इंडियन वूमन नेटवर्क (आयडब्ल्यूएन) हा उपक्रम के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय येथे नुकतेच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या प्रसंगी सीआयआय, नाशिकचे चेअरमन मनोज देशमुख, प्राचार्य डाॅ. के. एन. नांदुरकर व विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच सुमारे १०० विद्यार्थिनी व ५० महिला कर्मचारी उपस्थित होत्या. गुरुगोविंदसिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींनी देखील चर्चा सत्रात सक्रिय सहभाग घेतला.

महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींना उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने इंडियन वूमन नेटवर्कची स्थापना करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सीआयआयमधील सहभाग विषयी माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्वाती पवार यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. पी. के. शहाबादकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सीमा गोंधळेकर यांनी केले. प्रा. प्रीती भामरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. स्नेहल चौधरी व प्रा. रूपाली चोथे यांनी काम केले.कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. समीर वाघ, सचिव प्रा. के. एस बंदी, प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...