आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Guidance On Menstruation Misconceptions | Gift Of 160 Tables To The Students By The Innerwheel Club | Be Progressive That Will Make The Institution Proud

मासिकपाळी समज गैरसमजवर मार्गदर्शन:'इनरव्हील' क्लबकडून विद्यार्थीनींना 160 टेबल्सची भेट

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इनरव्हील क्लब नाशिक ने सावरकरनगर येथील नवरचना ट्रस्टच्या मुलींच्या शाळेस व धोंडेगाव आश्रम शाळेस 160 स्टील टेबल टॉप भेट दिले. हे स्टील टेबल टॉप इनरव्हीलच्या सदस्य मृणाल उत्कर्ष संगई ज्या इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन्स आणि उर्जयंत इंजिनीयरींग अंबड याच्या संचालिका असुन उपाध्यक्ष अनिता भसे यांच्या कन्या आहेत.

सावरकर नगर नाशिक येथील नवरचना ट्रस्टच्या मुलींच्या वसतीगृहासाठी आणि नवरचना ट्रस्टच्या धोंडेगाव आश्रमास मुलांना जेवायला आणि अभ्यास करता यावा म्हणून ही शैक्षणिक गरज ओळखून ईनरव्हील मार्फत ही मदत करण्यात आली आहे. कार्यक्रमाची सुरुवात नवरचना ट्रस्टचे ट्रस्टी रेडीओलॉजीस्ट डॉ. हेमंत कोतवाल यांनी प्रास्तविक करून केली.

आवडत्या क्षेत्रात काम करा

ईनरव्हील अध्यक्ष धारा मालुंजकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जी संस्था आपल्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेते आणि आपल्यासाठी प्रयत्न करते अशा संस्थेचा विद्यार्थी म्हणून त्या संस्थेला अभिमान वाटेल अशी प्रगती करावी. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करा आणि आई-वडिलांबरोबर आपल्याला घडवणाऱ्या प्रत्येक घटकाचे कायम ऋणी राहा.

मासिकपाळी समज गैरसमज

यावेळी अनिता भसे यांनी आभार मानले आणि एका तळ्यात होती बदके पिले हे सुरेख गीत सादर केले. तसेच इनरव्हील क्लब नाशिकने या मुलींसाठी मासिकपाळी समज गैरसमज तसेच मासिक पाळी दरम्यान मानसिक आरोग्य या विषयावर मुलींसाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुप्रिया मालसाने आणि स्रीरोगतज्ञ अपर्णा उपाध्ये यांचे मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन केले.

यांचे योगदान

मुलींनी यावेळी मासिकपाळी दरम्यानच्या आपल्या अडचणींचे निरसन करून घेतले. ईनरव्हील क्लबने मुलींना केळी आणि राजगिरा लाडूचे वाटप केले. अनिता भसे, ज्योत्स्ना पवार, स्मिता जोशी, कल्पना माळोदे, यमु अवकाळे यांची उपस्थिती होती. रचना ट्रस्टचे ट्रस्टी नामदेव पोखरकर, अतुल संगमनेरकर, पुष्पा जोशी, अध्यक्ष डॉ. शोभा नेर्लेकर, निरंजन ओक, वसंत एकबोटे, गौरी पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

बातम्या आणखी आहेत...