आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:संध्याछाया’च्या प्रथम वर्धापनदिनी याेगाचे महत्त्व यावर मार्गदर्शन

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील संध्याछाया हास्यक्लबचा प्रथम वर्धापन दिन श्रद्धाविहार कॉलनीतील ऋग्वेद गार्डन येथे उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक व आध्यात्मिक विषयावरील व्याख्याते सावळीराम तिदमे, माजी नगरसेवक श्याम बडोदे, अनिल देवरे, जनार्दन माळी उपस्थित होते.

वर्धापन दिनानिमित्त तिदमे यांनी ‘योग, प्राणायामचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड. श्याम बडोदे यांनी संध्याछाया वर्गासाठी येणाऱ्या अडचणी दूर करू, असे आश्वासन दिले. याप्रसंगी अमित बुडूख, योजना वाघ आदींनी मनोगत व्यक्त केले, प्रास्ताविक विजय महाले यांनी केले. सूत्रसंचालन तेंडुलकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...