आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणगाैरव समारंभ:राष्ट्रउभारणीत महिलांचे याेगदान विषयावर आज मार्गदर्शन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जनकल्याण संकुल समिती संचलित सावित्रीबाई फुले मुलींची अभ्यासिका, जनकल्याण संकुल, उत्तमनगर, सिडकाे येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्सव व गुणगाैरव समारंभ हाेणार आहे. मंगळवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाच वाजता हाेणाऱ्या या कार्यक्रमात राष्ट्रसेविका समिती, नाशिक विभागाच्या कार्यवाहिका शुभांगिनी कुलकर्णी या ‘राष्ट्रउभारणीत महिलांचे याेगदान’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी, प्रमुख अतिथी म्हणून महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, जनकल्याण समितीचे अध्यक्ष शैलेश पंडित उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...