आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटल युवा पर्व उपक्रम:स्पर्धा परीक्षांवर उद्या मार्गदर्शन ; राष्ट्रीय युवा दिन साजरा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्यावतीने अटल युवा पर्व अंतर्गत मंगळवारी (दि. ३) के. व्ही. एन. नाईक फार्मसी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनापासून ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिन दरम्यान अटल युवा पर्व उपक्रम राबविला जात आहेे. यामध्ये युपीएससी, एमपीएससी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, पीएसआय, एसटीआय, राज्यसेवा, पोलिस भरती, सरळ सेवा आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धा परीक्षांचे बदलते स्वरुप या विषयावर मनिष बोरस्ते, प्रा. जी. आर खैरनार आणि प्रा. प्रशांत ताकाटे यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. सहभागाचे आवाहन युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अमित घुगे, सागर शेलार, सुमित नहार, निखीलेश गांगुर्डे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...