आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुकीत भाविकांचा सहभाग:259 भाविकांचे गुरुचरित्र पारायण

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुकुल पीठाचे पीठाधीश प. पू. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बाल सुसंस्कार केंद्र पाटीलनगर, सिडको येथे श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ प्रहरी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. एकूण २५९ सेवेकरी बंधू- भगिनींनी सामूहिक गुरुचरित्र पारायणाचे वाचन केले.

श्री गणेशयाग, श्री चंडीयाग, श्री स्वामीयाग, श्री विष्णुयाग, श्री रुद्रयाग तसेच श्री गुरुचरित्र पारायण, श्री स्वामी चरित्र, श्री दुर्गा सप्तशती, श्री नवनाथ पारायण, श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथांचे वाचन करण्यात आले. श्री दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. १८ विभागांतर्गत ग्रामअभियान प्रचार प्रसारार्थ सदर परिसरातून दत्त महाराजांची पालखी काढण्यात आली. विवाह संस्कार विभागातर्फे वधू-वर नावनोंदणी जनकल्याण योजना, श्री स्वामी समर्थ मासिक अंक तसेच बालसंस्कार या विभागांची माहिती देण्यात आली.

स्वामी चरित्रावर लघुनाटिका सादर करण्यात आली. श्री सत्यदत्त पूजन बलीपूर्णाहुती व महाआरतीने सप्ताहाची सांगता करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. परिसरातील भाविक सेवेकरी व नागरिक उपस्थित होते. सर्व ज्येष्ठ सेवेकरी, स्वयंसेवक युवा पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...