आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्त जयंतीनिमित्त गुरूचरित्र पारायण:विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन; उद्या सायंकाळी श्री दत्त जन्मसोहळा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दत्तजयंती निमित्त शहरातील श्री दत्त मंदिरांमध्ये पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या (दि.7) दत्तजयंती सर्वत्र साजरी होणार आहे. या निमित्ताने विविध दत्त मंदिर व्यवस्थापन, भक्त मंडळांच्या वतीने श्री गुरूचरित्र पारायणासह विविध धार्मिक उपक्रम सुरू आहेत.

गोदाकाठी श्री एकमुखी दत्त मंदिरात सप्ताहास सुरूवात झाली. या मंदिरात सकाळच्या सत्रात श्री गुरूचरित्र आणि नवनाथ पारायण सोहळा सुरू आहे. याशिवाय लघुरूद्राभिषेक, किर्तन आदी उपक्रम सुरू आहेत. या मंदिरात बुधवारी सायंकाळी 7 वाजता श्री दत्त जन्मसोहळा होणार आहे. याशिवाय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांच्या विविध शाखांमध्येही दत्त जन्म सोहळा होणार आहे.

या निमित्त केंद्रांमध्येही श्रीगुरूचरित्र पारायण , गिताई याग, चंडी याग, रूद्र याग, मल्हारी यागाचे आयोजन करण्यात आले होते. उद्या स्वामी समर्थ केंद्रांमध्ये बली पुर्णाहूती आणि दुपारी 12.39 वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा होणार आहे. याशिवाय गंगापूर रोडवरील श्री क्षेत्र दत्तधाम येथेही दत्तजयंती सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक उपक्रम सुरू आहेत. उद्या दत्त जयंती सोहळाही येथे उत्साहात पार पडणार आहे.

गिरणारेत दत्त मंदिर वर्धापन दिन

गिरणारे येथील श्री एकमुखी दत्त मंदिराचा 15 वा वर्धापन दिन दत्त जयंती उत्सव आणि मराठी भाषेच्या आद्यकवी महदंबा स्मृतीदिन सोहळ्यानिमित्त धर्मसभा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. दत्त जयंतीनिमित्त उद्या येथे पहाटेच्या सुमारास देव मंगल स्नान, सकाळी 7 वाजता दत्तात्रेय कवच पाठ, 9.15 वाजता ध्वजारोहण, सकाळी साडेनऊ वाजता अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे आचार्य प्रवर सुकेणेकर बाबा शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली आकाश शास्त्री, गोविंदराज बाबा अंजनेरी, संतराज बाबा , दत्तराज बाबा हिसवळकर आदी मान्यवर उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून लक्ष्मी लॉन्स, गिरणारे येथे महाप्रसादाचे वितरण होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...