आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:2 साठेबाजांकडून 1 लाख 30 हजारांचा गुटखा जप्त

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न व अौषध प्रशासन विभागाने भद्रकाली आणि सातपूरला केलेल्या कारवाई एक लाख ३० हजारांचा गुटखा जप्त करत दोघा साठेबाजांवर अन्नसुरक्षा मानक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती आणि अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नितीन ट्रेडर्स या दुकानात गुटखा असल्याची माहिती मिळळताच अधिकाऱ्यांनी पोलिसांसह छापा टाकत ९८ हजारांचा गुटखा जप्त केला.

दुकानमालक नितीन रघुनाथ येवले यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या पथकाने राजवाडा सातपूर येथे रिझवान एजन्सी येथे सातपूर पोलिसांच्या मदतीने छापा टाकत २८ हजारांचा गुटखा जप्त केला. दुकान मालक परवेज रबूल शेख (रा. राजवाडा, सातपूर) याच्याविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...