आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई:पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पकडला 2 लाखांचा गुटखा

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात अवैध गुटखा विक्री सुरुच असून आज सकाळी अन्न व औषध सुरक्षा विभागाने २ लाख १३ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. आडगाव पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर विभागाने ही कारवाई केली. जितेंद्र रघुनाथ नेरपगार (वय ४२ रा. बिडी, कामगार नगर) असे संशयिताचे नाव आहे. आडगाव पोलिस ठाण्यात अन्न व सुरक्षा मानके कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि अन्न व सुरक्षा विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी दिनेश तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिमंदीरासमोर बिडा कामगार नगर येथे एका घरात अवैध गुटखा असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता घरातून गोवा राज्यात निर्मित महाराष्ट्रात बंदी असलेला विविध प्रकारचा गुठखा आढळला. अधिकाऱ्यांनी तो जप्त केला. संशयित हा मोठा साठेबाज असल्याचे तपासात निष्पन्न झाले. वरिष्ठ निरिक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

शहरात साठेबाजी

शहर व जिल्ह्यात गुटख्याची अवैध साठेबाजी सुरु असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले. दोन दिवसांपुर्वी गिरणारे येथे अन्न व सुरक्षा विभागाने सुमारे ५ लाखांचा गुटखा जप्त केला होता.

बातम्या आणखी आहेत...