आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरण:ज्ञानदीप आश्रम अत्याचार; मोरेच्या घराची झडती

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानदीप आश्रमात सहा अल्पवयीन मुलींवर आणि सटाणा येथे एका मुलीवर अत्याचार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सटाणा पोलिस ठाण्यात संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याने पथकाने सटाणा येथील संशयिताच्या घराची झडती घेतली. संशयिताचे आई वडील, पत्नीची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संशयिताने पीडित मुलींना हातपाय दाबण्याचा बहाणा करत मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ लावत अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. संशयिताने सटाणा येथील मोरे वस्तीवर शिक्षणासाठी असलेल्या अल्पवयीन मुलीचेही शोषण केल्याचा गुन्हा सटाणा पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने सहायक आयुक्तांच्या पथकाने सटाणा येथील घराची झडती घेतली. परिसरातील नागरिकांकडून माहिती मिळवली. २०११ पासून संशयिताच्या घरी अल्पवयीन मुली वास्तव्यास असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. एकंदरीत या गुन्ह्याची व्याप्ती वाढत चालली असून अत्याचार झालेल्या मुलींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...