आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका क्षेत्रात कोराेनाचे १६ सक्रीय रूग्ण असताना आता बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून देशभरात प्रार्दुभाव झालेल्या ‘एच ३,एन २’ या इन्फ्लूएंझा या विषाणूचे १ फेब्रुवारी ते १२ मार्च यादरम्यान चार रुग्ण आढळले आहेत. मात्र या चारही रुग्णांची प्रकृती चांगली असून नागरिकांना घाबरून जावू नये असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डाॅ बापुसाहेब नागरगाेजे यांनी केले आहे.
सध्या कडक उन्हाळ, अधुन मधून पडणारा पाऊस व अचानक उष्ण व थंड हवेचे विचित्र हवामान असल्यामुळे सर्दी, खाेकला, ताप, अंगदुखी, उलटी, मळमळ अशा लक्षणांशीसंबधित आजारांनी डाेकेवर काढले आहे. त्यात केराेनाची रूग्ण संख्याही वाढत असली तरी तीव्रता कमी आहे. साेमवारी १३ तर मंगळवारी सहा केराेना बाधीत आढळले. दरम्यान स्वाईन फ्लू व ‘एच ३,एन २’ या इन्फ्लूएंझा या विषाणूशीसंबधित आजाराची लक्षणे जवळपास सारखीच आहे. त्यामुळे पालिकेने १ फेब्रुवारी ते १२ मार्च पर्यंत सापडलेल्या स्वाईनफ्लूच्या १७ रुग्णांच्या नमुन्यांची फेरतपासणी केल्यानंतर त्यात, शहरात ‘एच ३ व एन २’ या विषाणूचे चार रुग्ण आढळून आले आहेत. ४ फेब्रुवारी रोजी शहरातील सिडकोतील एका २८ वर्षीय महिला रूग्ण प्रथमत: बाधीत झाली हाेती. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी इंदिरानगर येथे एक, १ मार्च रोजी महात्मानगरमधील २८ वर्षीय महिला तर ९ मार्च रोजी सिडकोतील एका ५८ वर्षीय पुरूषाला या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र चारही रूग्णांची प्रकृती चांगली आहे.
अशी आहेत लक्षणे-
सर्दी, ताप,खोकला,अंगदु:खी, जुलाब उलट्या ही एच-३,एन-२ या इन्फ्लूएंझाचे लक्षणे आहेत. अशा प्रकारची लक्षणे दिसताच,रुग्णांनी तात्काळ उपचार सुरू करावेत असे आवाहन पालिकेने केले आहे.
कोट..
सर्दी, ताप, खाेकल्यावर लवकर उपचार घ्यावे
शहरात ‘एच ३ व एन २’ या विषाणूचे चार रुग्ण आढळले असले तरी, चाैघांची प्रकृती चांगली आहे. मात्र नागरिकांनी सतर्कता बाळगत सर्दी,ताप,खोकला अशी लक्षणे असल्यास तात्काळ उपचार करून घ्यावेत.
डॉ.बापुसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिक्षक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.