आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेचे‎ दुर्लक्ष:नाशिक विभागीय कार्यालयावर पाथर्डीच्या महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा‎, ‎ अधिकाऱ्यांना विचारला जाब

इंदिरानगर‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी भागातील मोंढेनगरमधील‎ रामभूमी राेहाउस, वाटिका सोसायटी, ‎ ‎ रखुमाई राेहाउस येथील नागरिकांना‎ सहा महिन्यांपासून पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत‎ असल्याने संतप्त महिलांनी पालिकेच्या ‎ ‎ नवीन नाशिक विभागीय कार्यालयावर ‎ हंडा मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब ‎ ‎ विचारला.

पाणीप्रश्न तात्काळ न ‎ ‎ सोडविल्यास राजीव गांधी भवनावर‎ मोर्चा नेण्यात येइल असा इशाराही‎ महिलांनी दिला.‎ पाथर्डी परिसरातीला मोंढे‎ नगरमधील पाणी प्रश्नाबाबत वेळोवेळी‎ पत्रव्यवहार तसेच, निवेदन देऊनही‎ पाणी समस्या सोडविण्यासाठी‎ ‎पालिकेकडून कोणतीही उपाययोजना‎ होत नसल्याने अखेर महिलांनी हंडा‎ मोर्चा काढला होता. पाण्याअभावी‎ दैनंदिन कामेही हाेत असल्याने ‎ ‎ महापालिकेने तत्काळ पाणीप्रश्न‎ निकाली काढण्याची मागणी यावेळी ‎ ‎महिलांनी केली.‎

परिसरातील पाण्याची टंचाई‎ लक्षात घेऊन महापालिकेकडे‎ वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही‎ पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.‎ - भगवान दोंदे, माजी नगरसेवक‎