आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Hanuman's Birthplace Is Anjanerich; A Council Of Sadhus saints mahants, People's Representatives, Villagers Will Present Evidence In The Supreme Court

बैठकीत ठराव:हनुमान जन्मस्थळ अंजनेरीच; सर्वोच्च न्यायालयात पुरावे सादर करणार, साधू-संत-महंत, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांची घेणार परिषद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बहुचर्चित हनुमान जन्मस्थळाचा वाद आता राज्य-केंद्र सरकारसोबतच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. प्रभू श्रीरामांचे परमभक्त हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरीच असून भविष्यात याबाबत कुठलाही वाद होऊ नये यासाठी आता साधू-संत-महंत, पालकमंत्री, खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांची स्वतंत्र ग्राम परिषद घेऊन त्याचा ठराव केंद्र आणि राज्य सरकारला पाठवला जाईल. अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचे सर्व पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर करून त्यावरच शिक्कामोर्तब केले जाईल, असा एकमुखी निर्णय साधू-महंत आणि अंजनेरी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झाला.

हनुमान जन्मस्थळावरून निर्माण झालेल्या वादात महत्त्वाची भूमिका बजावणारे अन् गोविंदानंद महाराज यांच्यावर माइक उगारणारे महंत सुधीरदास यांच्यासह इतर साधू-महंतांचा अंजनेरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार अन् अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचे प्रमाण अयोध्येतील रामजन्मभूमीचे आचार्य गंगाधर पाठक महाराज यांनी जाहीर केल्याने त्याचा आनंदोत्सव अंजनेरी गडाच्या पायथ्याजवळील श्री हनुमान मंदिर येथे गुरुवारी साजरा करण्यात आला. या वेळी पंचमुखी हनुमान मंदिर प्रमुख आणि दिगंबर आखाड्याचे भक्ती चरणदास महाराज, राष्ट्रसंत स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्यासह नाशिक -त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित साधू-महंतांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यात गोविंदानंद सरस्वती महाराजांनी हनुमान जन्मस्थळावरून उगाच वाद घातल्याचा आरोप या वेळी उपस्थितांनी केला.

संत-महंतांच्या बैठकीत पंचक्रोशीतील ग्रामस्थही उपस्थित
अंजनेरी गडावर १११ फुटी धर्मध्वज अन् देशातील भव्य मंदिर उभारणार
अंजनेरी गडावर जेथे श्रीरामभक्त हनुमानाचे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी १११ फुटी धर्मध्वज उभारणार आहोत. तसेच अंजनेरी गडावर देशातील सर्वात भव्य असे हनुमान मंदिर उभारणार असल्याचे अंजनेरी ग्रामस्थांच्या वतीने राजाराम चव्हाण यांनी सांगितले. एकूणच आता अंजनेरीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत येणार असल्याचे या निमित्ताने दिसते.

बातम्या आणखी आहेत...