आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हर घर तिरंगा' उपक्रम:राज्यातील सर्व बसस्थानक, एसटी कर्मचाऱ्यांच्या घरावर फडकणार तिरंगा; महामंडळाच्या सूचना

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्टदरम्यान केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे 'हर घर तिरंगा' उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपक्रमात एसटी महामंडळाने देखील पुढाकार घेतला असून या कालावधीदरम्यान राज्यातील प्रत्येक बसस्थानकाबराेबर एसटी कर्मचाऱ्यांच्या घरावरही तिरंगा फडकावण्यात येणार आहे. तसेच, एसटीच्या वतीने यानिमित्त स्वच्छता, जनजागृती माेहीमदेखील राबवण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रम राबवण्याबाबत राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग व स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांतर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. आता महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्यावतीनेदेखील पुढाकार घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्यावतीने राज्यातील सुमारे १५० बसवर जाहीरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच, हर घर तिरंगा जाहीरातींचे हाेर्डिंग्स राज्यातील प्रमुख १०० स्थानकांवर लावण्यात येणार आहे. तसेच, या उपक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येक बसस्थानकावर दर्शन भागात तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहे. बसस्थानकांवर रांगाेळी, विद्यूत राेषणाई करत सजावट करण्यात येणार आहे. याच बराेबरच ९ ते १५ ऑगस्टदरम्यान आगार व बसस्थानक पातळीवर स्वच्छता सप्ताह पाळण्यात येणार आहे. या उपक्रमात राज्य परिवहन मंडळाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने सहभागी हाेवून त्यांच्या घरावर तिंरगा लावावा, अशा सूचना एसटी महामंडळाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...