आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरपाल राजपूत ठरला कर्मवीर श्री 2023 चा मानकरी:5 जिल्ह्यांची उत्तर महाराष्ट्र स्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, 100 स्पर्धकांचा होता सहभाग

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

के. के. वाघ शिक्षण संस्था, स्माईल अँण्ड स्पिनॅच संस्था व बॉडी बिल्डींग अँड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाच जिल्ह्यांची उत्तर महाराष्ट्र स्तरीय कर्मवीर श्री २०२३ या शरीरसौष्ठव स्पर्धा के. के. वाघ अभियांत्रिकी कॅम्पस येथे पार पडली. या स्पर्धेत नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर व नंदुरबार जिल्हातील एकुण १०० शरीरसौष्ठव पटुंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यापैकी धुळे येथील हरपाल राजपुत हा २०२३ सालचा कर्मवीर श्री स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. त्याला १५ हजार रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देत सन्मानित केले.

या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी स्माईल अँण्ड स्पिनॅच संस्थेचे सचिव अजिंक्य वाघ, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणिस राजेंद्र सातपूरकर, धुळे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रकाश दाभाडे, अहमदनगर जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस सोहेल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, बॉडी बिल्डींग अण्ड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, प्रशांत दिवे, धनंजय शिंदे, आर. आर. नंदनवार आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

कर्मवीर मेन्स फिजीक २०२३ या किताबाचा प्रथम मानकरी गौरव ठाकरे तर व्दितीय मानकरी प्रविण मोरे, तृतीय मानकरी आयुष हरसोरा तसेच चतुर्थ क्रमांक पवन पारधे तर पाचवा क्रमांक उदयराज जाधव यांनी पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे ४०००, ३५००,२५००, २००० व १५०० रूपयांचे रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर बेस्ट पोजरचा किताब मालेगावच्या जहीर अहमद याने रू. ७००० सह सन्मानचिन्ह तसेच मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डरचा किताब सचिन लोखंडे याने रू. ५००० आणि सन्मानचिन्ह पटकावले.

स्पर्धेतील तिन्ही किताब विजेत्यांना डॉ. अनिरूध्द धर्माधिकारी यांचे तर्फे एकुण ११००० रूपयांचे रोख रक्कम प्रोत्साहनपर पारितोषिक दिले.स्पर्धेचे सूत्रसंचालन सारंग नाईक, भाउदास सोनवणे यांनी केले. गुणलेखक म्हणून राजेंद्र सातपुरकर व किशोर सरोदे यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेचे पंच म्हणून हेमंत साळवे, विजय गोसावी, प्रकाश दाभाडे, सोहेल शेख, युसुफ शेख, विशाल वेद, संजय जाधव, नदिम खान, सत्यजीत बच्छाव यांनी कामकाज पाहिले. या स्पर्धेदरम्यान सुरेखा श्रीकांत शेरताटे व कविता शेवरे यांनी प्रात्यक्षीके सादर केली.

बातम्या आणखी आहेत...