आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफौजादारी असो अथवा दिवानी खटला असो न्यायालयात न्याय मिळण्यास अनेक वर्ष लागतात. कुणाचे आयुष्य निघून जाते तरी निकाल लागत नाही. मात्र यास अपवाद ठरला आहे. लुटमारीच्या गुन्ह्याचा तीन महिन्यापुर्वी दाखल केलेल्या खटल्यात आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठवली. सुनिल लाशा डगळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहिती अशी, पंचवटी पोलिस ठाण्यात २१ स्प्टेंबर २०२२ रोजी लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील फिर्यादी हिरालाल कोल रा. औरंगाबादरोड हे सायंकाळी 4 वाजता म्हसोबा पटांगण बुधवार बाजार येथे उभे असतांना एक अनोळखी इसमाने पत्ता विचारण्याचा बहाणा करत हुज्जत घालून कोल यांचे दोन्ही हात पकडून खिशातून बळजबरीने मोबाईल लुटून नेला होता. पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनिरिक्षक प्रविन देवरे यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपी सुनिल लाशा डगळे रा. गौरी पटांगण याला अटक केली होती. त्याच्या ताब्यातून दोन मोबाईल हस्तगत केले होते. उपनिरिक्षक देवरे यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करत आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करुन आरोपीच्या विरोधात तत्काळ चार्जसिट दाखल केले होते. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी क्रमांक ८ प्रतिभा ए.पाटील यांनी या गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरुन आरोपीला ३ वर्ष सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठवली. सकारपक्षा तर्फे जी.आर.बोरसे यांना कामकाज पाहिले. पैरवी व्ही.ए.नागरे, पी.पी. गोसावी यांनी पाठपुरावा केला.
पंचवटी पोलिसांनी आरोपीला काही तासांत अटक केली होती. गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात आठ दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले होते. फिर्यादी,पंच, साक्षीदार यांची साक्ष झाल्यानंतर न्यायालयात खटला वेगान चालवला गेला. आरोपीला शिक्षा ठोठवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.