आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल:'पवारसाहेब आज मला तुमची खूप आठवण येतेय, ते माझ्या वडिलांसारखे आहेत' - चित्रा वाघ

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा चव्हाण प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 12 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. यासोबतच आज पवार साहेबांची खूप आठवण येत असल्याचेही त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, 'त्यावेळी पाच जुलैला गुन्हा दाखल झाला आणि 7 जुलैला मी साहेबांकडे गेले होते. पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत. माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार साहेबांनी मला बोलावून घेतले. एफआयआरची कॉपी मला मागितली. मी त्यांना ती कॉपी दाखवली. साहेबांनी सर्व वाचले आणि म्हणाले, चित्रा तुझा नवरा यात कुठेच नाही. त्यानंतर केस उभी राहिली.'

चित्रा वाघचा नवरा म्हणून त्यांना शिक्षा
चित्रा वाघ पुढे बोलताना म्हणाल्या की, केवळ चित्रा वाघचा नवरा म्हणून माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. लाच घेताना माझा नवरा त्या ठिकाणी नव्हता. ज्यांनी लाच घेतली त्यांची अजुनही चौकशीच सुरू आहे. मात्र माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. केवळ पूजा चव्हाण प्रकरण मी लावून धरले आहे यामुळेच आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. पण मी शांत बसणार नाही. मी बोलतच राहणार असेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

का दाखल केला गुन्हा?
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पूर्वी किशोर वाघ यांना याप्रकरणी अटक झालेली होती. आता या प्रकरणामध्ये त्यांची चौकशी केली जाणार आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती अर्थात बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप किशोर वाघ यांच्यावर लावण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB)हा गुन्हा दाखल केला. किशोर वाघ यांच्याकडे असणारे 90.24 टक्के संपत्ती ही बेहिशोबी असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...