आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • He Killed His Wife By Hitting Her On The Head With An Iron Shovel Saying She Was Not Beautiful, The Husband Was Sentenced To Life Imprisonment

क्राईम:सुंदर दिसत नसल्याचे सांगून, डोक्यात लोखंडी फावड्याने वार करून पत्नीचा केला खून, पतीला जन्मठेपेची शिक्षा

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली कॅम्प परिसरातील नानेगाव शिवारात राहणाऱ्या कामगाराने पत्नीशी वाद करून तू रंगाने काळी आहेस, सुंदर दिसत नाही म्हणत डाेक्यात लाेखंडी फावडा मारून खून केल्या प्रकरणात न्यायालयाने संशयित पतीस जन्मठेपेची शिक्षा ठाेठावली आहे

विशेष म्हणजे, घटना घडून दाेन वर्ष पुर्ण हाेत असतानाच न्यायालयाने निकाल दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, २५ जानेवारी २०२० राेजी संशयित आरोपी हिरामण निवृत्ती बेंडकुळे (३० रा. जय भवानी वस्ती, नाणेगाव) हा घरात बसलेले असताना पत्नी काजल (२६) हिच्याशी किरकाेळ कारणावरून वाद झाला. यामध्ये हिरामण याने पत्नी काजल ला तू रंगाने गाेरी नसून सुंदर दिसत नाही, मला शाेभत नाही, असे बाेलून शिवीगाळ करीत मारहाण केली. यातच संशयित हिरामण याने काजलच्या डोक्यात लोखंडी फावड्याने वार करून तिचा खून केला होता.

बातम्या आणखी आहेत...