आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:कोर्टात जिवे मारण्याची धमकी देत मागितली ५० हजारांची खंडणी

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सराईत गुन्हेगारांची दहशत सुरूच असून पंचवटीमधील सराईत गुन्हेगारांनी एकास न्यायालयातच जिवे ठार मारण्याची धमकी देत ५० हजारांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा व सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाच्या आवारात उघडकीस आला. याप्रकरणी जयेश हिरामण दिवे ऊर्फ जया, अरुण गायकवाड या दोघांच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पवन कातकाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात कोर्ट कामकाजासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाच्या पायरीवर ओळखीचा मित्र रोहित उघडे याच्यासोबत बोलत असताना संशयित जया दिवे याने समोर येऊन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. खर्च पाणी करण्यासाठी ५० हजारांची खंडणी मागितली. अशी तक्रार सरकारवाडा पोलिस ठाण्यात दिली. वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

शहरात वावर :
संशयित सराईत गुन्हेगारांचा शहरातच वावर वाढला आहे. या गुन्हेगारांना राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा वरदस्त असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
भाई, दादा, नाना यांचे फलक : शहर व परिसरात गुन्हेगारांचे फलक लावून सर्थकांकडून नागरिकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गुन्हेगार आणि त्यांच्या समर्थकांवर पोलिसांकडून कठाेर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

न्यायालयात समर्थकांची गर्दी
गुन्ह्यात न्यायालयात हजर झालेल्या सराईत गुन्हेगारांच्या समर्थनासाठी न्यायालयात समर्थकांची गर्दी होत आहे. या मुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समर्थकांवर पूर्वी धडक कारवाई केली जात होती. मात्र ही कारवाई थंडावल्याने न्यायालयात समर्थकांची गर्दी वाढत असल्याचे निदर्शनास येते आहे. यामुळे न्यायालयाच्या आवारात वकील, पक्षकार, आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा एेरणीवर आली आहे.

सराईत गुन्हेगारांची दहशत वाढली
सराईत गुन्हेगारांची दहशत वाढत असून ही बाब सामान्य नागरिक आणि यंत्रणेला आव्हान आहे. पंचवटीमधील सराईत गुन्हेगारांनी खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपीला जिवे मारण्याची धमकी दिली. दिवे याच्या विरोधात खून, दरोडा, खंडणी, प्राणघातक हल्ला आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर रस्त्यावर फटाके वाजवून जल्लोष साजरा केला जाताे. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनादेखील खुले आव्हान दिले होते.
सराईत गुन्हेगारांची दहशत

बातम्या आणखी आहेत...