आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी डाॅक्टर तरुणीवर मित्राकडून बलात्कार:पालघरच्या जंगलात ओढणीने हातपाय बांधत अत्याचार

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका युवतीला तिच्या जुन्या मित्राने बळजबरीने दुचाकीवरुन नेत पालघरच्या जंगलात बलात्कार केला. गुरुवारी ही गंभीर घटना उघडकीस आली. महामार्ग बसस्थानकातून तरुणीला त्याने दुचाकीने पालघर येथे नेत हे कृत्य केले. याप्रकरणी पीडित युवतीने मनोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन योगेश प्रकाश भुयाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची सुरुवात मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून झाल्याने हा गुन्हा टपालाने शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

पीडित तरुणीच्या कपाळावर झालेली जखमेपाहून आई-वडिलांना काहीतरी बरे वाईट घडल्याचा संशय आला. मुलीला विश्वासात घेत विचारले असता, ओळखीच्याच तरुणाने बलात्कार केल्याचे तिने सांगितले. माहितीनुसार, पीडिता संगमनेरमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेते. १० ऑक्टोबर रोजी संगमनेर येथून बसने महामार्ग बसस्थानक येथे आली. तेथे मित्रासोबत पालघरला जाण्यासाठी बसची वाट बघत होती. ओळखीचाच संशयित आरोपी योगेश भुयाळ त्यावेळी बसस्थानकात आला. त्याने तरुणीसोबत असलेल्या मित्राला निघून जाण्याची धमकी दिली. त्यामुळे मित्र भीतीने निघून गेला. संशयिताने बळजबरीने तरुणीला दुचाकीवर बसवले. तिने आरडाओरड केली, तेव्हा त्याने ठार मारण्याची धमकी दिली. जव्हारमार्गे पालघरच्या जंगल परिसरात त्याने अत्याच्याराची संधी साधली.

कपाळावर दगडाने वार
संशयिताने गाडी जंगलाजवळ थांबवून बळजबरीने तरुणीला फरफटत जंगलात नेले. दाट झाडीमध्ये त्याने युवतीचे तिच्याच ओढणीने हात पाय बांधले. तरुणीने झटापट नेत असताना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तर संशयिताने जवळच पडलेल्या दगडाने तिच्या कपाळावर मारुन जखमी केले. त्यानंतर तोंडात रुमाल कोंबून तिच्यावर अत्याचार केला. रक्तबंबाळ झालेल्या तरुणीला कुणास काही सांगितले, तर ठार मारण्याची धमकी देत गाडीवरुन पालघरला सोडून दिले.

बातम्या आणखी आहेत...