आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आरोग्य तपासणी शिबिर

इंदिरानगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, चेतनानगर यांनी इंटरनॅशनल लाॅजिटिव्हिटी सेंटर पुणे व फिजिअोथेरेपी काॅलेज यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी दास मारुती मंदिराच्या सभामंडपात तपासणी शिबिर आयाेजित केले होते. अस्थी शल्यविशारद डॉ. विजय काकतकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी ‘सांधेदुखीविषयी घ्यायची काळजी’ या विषयावर उद्बोधक मार्गदर्शन केले. मविप्रच्या फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अमृत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजच्या १२ डॉक्टरांनी एकूण ६८ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करत उपाय सुचविले. मेघना खेर यांनी व्यवस्थापन केले.

बातम्या आणखी आहेत...